टाकळकरवाडी शाळेच्या आदर्श शिक्षिका स्मिता लोंढे मॅडम यांनी 12 राज्यातून आलेल्या 140 शिक्षकांना खूप छान मार्गदर्शन केले .सर्व मार्गदर्शक शिक्षक हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे होते ,फक्त आपल्या ZP (Zilla Parishad) शाळेच्या एकच शिक्षिका होत्या त्या म्हणजे लोंढे मॅडम .खूप ओघवत्या भाषेत त्यांनी मार्गदर्शन केले .
कॉन्फरन्स खूप छान झाली ,विविध राज्यातील शाळा,विद्यार्थी, त्यांची शिकविण्याची पद्धत, विद्यार्थी मार्गदर्शन, आणि विद्यार्थ्यांना स्वतः विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्याची शिक्षकांची प्रवृत्ती दिसून आली ,आपल्याला आपल्या शाळेत काय काय करता येईल याची कल्पना आली ,tinkers कसे तयार करावे हे खूप छान समजले,विपुल सरांची धडपड ,सोनिया मॅडमचे नियोजन ,खूपच छान होते .
एखादा इव्हेंट कसा organise करावा याचे खूप सुंदर उदाहरण या कॉन्फरन्सच्या निमित्ताने दिसून आले .चहा ,नाष्टा ,दुपारचे जेवण ,स्नॅक्स, अप्रतिम कुठेही नाव ठेवण्यासारखे काहीच नव्हते ,प्रथमतःच मी माझ्या 18 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये सकाळी 9.15 ते 4.45 पर्यंत एका जागेवर बाहेर कुठेही न जाता ट्रेनिंग/कॉन्फरन्स अटेंड केली असेल इतके नियोजन उत्तम होते न कंटाळता न थकता हसत खेळत दिवस गेला .
काय मिळाले म्हणाल तर खूप काही नवीन शिकायला मिळाले, जे आपण नेहमी करतो त्यालाच योग्य दिशा दिली तर आपणही भावी काळात एक आदर्श म्हणून सर्वांपुढे उभे राहू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला .
कॉन्फरन्स साठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना निमंत्रित केल्या बद्दल सोनिया मॅडमचे खूप खूप आभार.अशाच कॉन्फरन्स कायम होवोत आणि आम्हाला नवीन नवीन कल्पना ,ज्ञान मिळो हीच अपेक्षा .
धन्यवाद CS पाठशाळा टीम!
Santosh Hande, Zilla Parishad School, Khed
(Award winning teacher of ZP school from Takalkarwadi, Khed Mrs Londhe, addressed the CSPathshala Teacher’s meet. She guided 140 teachers from 12 states in India in fluent English. This despite her being a ZP school teacher and the audience being English medium teachers! Excellent conference, we came to know about schools from various states, their students and teaching methodology that the Teachers adopt to make the students think independently. It gave us ideas, what things we can implement in our schools. How to use tinkers became absolutely clear to us.We got to learn a lot of new things. We came to know, that if we carry out the things we routinely undertake with an innovative turn, even we can become role models for others. We gained confidence.)